Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर ; तर आजपासून आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीला सुरुवात

Rahul Narvekar | मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या आपत्रेबाबत निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. परंतु 16 आमदारांच्या आपत्रेबाबत लवकरात- लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून सतत करण्यात येत होती. याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. तर आजपासूनच (17 मे) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं पहायला मिळत आहेत.

शिंदे- ठाकरे गटाच्या 54 आमदारांना नोटिसा पाठवणार

काल नार्वेकर यांनी बैठक घेतली होती त्यानंतर आज ते ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटिसा पाठवणार आहेत. या नोटिसमधून 54 आमदारांना सात दिवसांच्या आधी आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसचं या आमदारांचं म्हणणं ऐकूनच राहुल नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचप्रमाणे नार्वेकर यांनी दोन्ही पक्षांची राजकीय घटना देखील मागवून घेतल्या आहे त्या घटनेचा अभ्यास करूनच निर्णय दिला जाणार . असं देखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कोर्टाने सांगितले होते की, कोणत्याही पक्षाला आम्हीच शिवसेना आहोत असा दावा करता येणार यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. तर ठाकरे गट हा पक्ष नसून एक गट ठरला आहे. यामुळेच जर राहुल नार्वेकर यांनी देखील जर निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली. तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे आता पुढे काय होणार? राहुल नार्वेकर नक्की काय निर्णय घेणार? अपात्र कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like