Rahul Narwekar | “…म्हणून संजय राऊतांकडून बेजबाबदार वक्तव्य केले जातात” ; राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

Rahul Narwekar | मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये सत्ता संघर्षाचा निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. नार्वेकरांनी राजीनामा द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्याला नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे.

“संजय राऊत यांचा संविधानाचा अभ्यास कमी असल्यामुळे आणि संविधानातील तरतुदींचे वाचन न केल्यामुळे त्यांच्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य केले जातात. त्यामुळे जनतेनं त्यांना माफ करावं असं मला वाटतं”, अशा शब्दांमध्ये राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अध्यक्ष स्वतःकडे अधिकार खेचून घेतात असा आरोप संजय राऊत यांनी नार्वेकरांवर लावला होता. त्यावर उत्तर देत नार्वेकर म्हणाले, अध्यक्ष कोणताही अधिकार खेचून घेत नाहीये. अध्यक्ष केवळ संविधानातील तरतुदींविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.”

दरम्यान, माध्यमांशी बोलताना संजय राऊत राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल नार्वेकर यांची कायदा मंत्र्यासोबत बैठक झाली होती. कायदा मंत्र्यानी बंद दरवाजाआडच्या बैठकीत काय होणार हे सांगितलं का? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसं माहीत? ही कोणती दादागिरी आहे? कायदा मंत्री तीन तास बंद दाराआड चर्चा करतात हे काय चाललंय? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. तसचं राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या

You might also like