Rahul Narwekar | 16 अपात्र आमदारांचं काय होणार? मुंबईत पोहोचताच नार्वेकर म्हणाले…

Rahul Narwekar | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसापासून लंडन दौऱ्यावर होते. आज ते मुंबईत परतले आहे. मुंबईमध्ये पोहोचताच नार्वेकरांनी सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, “न्यायालयाने दिलेल्या निकालावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हा निर्णय पूर्ण चौकशी करून कायद्याच्या तरतुदीनुसार घेतला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयासाठी कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही आणि उशीर देखील केला जाणार नाही. आपण सगळ्यांनी चिंतामुक्त राहा, कारण जो निर्णय घेतल्या जाईल तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून घेतला जाणार आहे.”

विधानसभा अध्यक्षांवर दबाव निर्माण केला जात आहे, असं देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यावर उत्तर देत राहून नार्वेकर म्हणाले, “सभागृहाच्या बाहेर केलेल्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. मी त्याकडे लक्षही देत नाही. कायद्याच्या तरतुदीनुसारच निकाल जाहीर केला जाईल.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी कुणाच्या मनानुसार व्हावं म्हणून निर्णय घेणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जाणार आहे. कुणाला वाटत असेल लवकर निर्णय यावा तर आम्ही तो देऊ शकत नाही. प्रक्रिया लवकर पूर्ण झाली तर लगेच निर्णय येईल.”

महत्वाच्या बातम्या