Rahul Narwekar | 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला गती! न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार?
Rahul Narwekar | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर आज (14 जुलै) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काय आदेश देतील? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Rahul Narvekar should take a decision on the disqualification of 16 MLAs at the earliest – Thackeray group
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठासमोर या याचिकेची सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर सोपवला होता.
नार्वेकरांना हा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नार्वेकरांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील आमदारांना नोटीस पाठवली आहे. या आमदारांना नार्वेकरांच्या (Rahul Narwekar) नोटीसचं उत्तर येत्या सात दिवसांमध्ये घ्यावं लागणार आहे. तर न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार राहुल नार्वेकर यांना 11 ऑगस्टच्या आधी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | शिंदे गटात नाराजी? शिंदेंच्या बैठकीत रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची हजेरी
- Ajit Pawar | अखेर मुहूर्त लागला! पुढील 24 तासात अजित पवार गटाला होणार खातेवाटप
- Ambadas Danve | “अजित पवारांना मुख्यमंत्री करा अन् एकनाथ शिंदेंना…”; अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य
- Nikhil Wagle | नवाब मलिक अजितदादांसोबत गेले तर ताबडतोब जामिनावर सुटतील – निखिल वागळे
- Vijay Wadettiwar | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते – विजय वडेट्टीवार
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JW6FYS
Comments are closed.