Rahul Narwekar | 16 आमदारांच्या आधी शिवसेना कोणाची हा निर्णय घ्यावा लागेल; राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

Rahul Narwekar | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी पत्रकारांची संवाद साधला आहे. हा निर्णय घेण्यासाठी उशीर केला जाणार नाही त्याचबरोबर निर्णय घेण्याची घाई देखील केली जाणार नाही. कायद्याच्या तरतुदीनुसारच हा निर्णय घेण्यात येईल असं मत राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलं  आहे.

माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, “16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देण्याआधी शिवसेना नक्की कुणाची? हे आधी ठरवावे लागेल. कोणता गट खरा पक्ष आहे यावर आधी निर्णय द्यावा लागणार आहे. हा निर्णय घेताना दोन्ही पक्षाचे मत ऐकून घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच एका गटाला पक्षाचे अधिकृत अधिकार मिळतील.”

“सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर हा निर्णय द्यायला सांगितला आहे. या निकालापूर्वी काय काय प्रक्रिया करावी लागणार आहे हे आधी बघावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय घेण्यासाठी साधारण दहा महिने लागले होते. मी दोन महिन्यात हा निर्णय कसा देणार?”, असा सवाल देखील राहुल नार्वेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे

यावेळी बोलताना राहुल नार्वेकरांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे, ते म्हणाले, “मला धमक्या देऊन हवा तो निर्णय मिळणार नाही. संजय राऊत यांच्या टीकेला मी काडीमात्र किंमत देत नाही. त्याचबरोबर संजय राऊतांकडं दुर्लक्ष केलेलं बरं असतं. मात्र, त्यांनी वेळीच आपलं बोलणं थांबवावं”

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.