Rahul Shewale | “रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने…”; आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत राहुल शेवाळेंचे गंभीर आरोप

Rahul Shewale | नागपूर : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत  हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “रिया चक्रवर्तीला एयू चे 44 फोन आले होते. बिहार पोलिसांनुसार एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे असून CBI चौकशी वेगळेच सांगते त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे”, अशी मागणी आज लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केली.

राहुल शेवाळे म्हणाले, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या तपासाचा कुठलाही खुलासा केला नाही. सीबीआयने याबाबत कुठलीही माहीती दिलेली नाही. त्यामुळे याबाबतची सत्यता जनतेला समजावी यासाठी मी गृहमंत्र्यांना मी निवेदन दिले आहे. “रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरं आहे का?, असे सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलेत.

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे म्हणाले की, “सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची माहिती अद्याप जनतेपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं जनतेला मिळायला पाहिजे. पुढे ते म्हणाले रिया चक्रवर्तीवर एनसीबीने कारवाई केली.

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ड्रग्जसंदर्भातील चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाचा उल्लेख अनेक खासदारांनी आणि मीही केला. पण सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला फोन कॉल आले होते. याचा उल्लेख बिहार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. ते कॉल ‘एयू’ (AU) या नावाने आले होते, अशी माहिती त्यांनी आज लोकसभेत दिलीय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.