राहुल वैद्य नवीन गाण्यामुळे अडचणीत, मिळतेय जीवे मारण्याची धमकी

मुंबई : ‘बिग बॉस’ फेम राहुल वैद्यने नवरात्री उत्सवासाठी त्याचं एक खास गाणं रिलीज केलंय. मात्र गाणं रिलीज होताच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यामुळे राहुलला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.

राहुलच्या ‘गरबे की रात’ या गाण्यामध्ये ‘श्री मोगल माँ’ यांचा उल्लेख आहे. गुजरातमध्ये मोगल माँ यांचे अनेक भक्त आहेत. माध्यमांशी संवाद साधताना राहुल वैद्यचे प्रवक्ता म्हणाले, “होय मेसेज आणि कॉल्सचं प्रमाण काल रात्रीपासून वाढू लागलं आहे. यात त्याला जीवी मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं बोललं जात आहे.”

दरम्यान “या गाण्यात मोगल माँ यांचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करण्यात आला आहे. जर या गाण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांच्या भावनांचा सन्मान करून हे सर्व ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला हे ठीक करण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी या सर्वांना विनंती आहे.” असं राहुलचे प्रवक्ता म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा