InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रेल्वे मेघ ब्लॉक

आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रेल्वे रुळांची देखभाल, ओव्हर हेड वायरची दुरुस्ती यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी, ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे यादरम्यान मेगाब्लॉक आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक आहे. यावेळी कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणा-या जलद लोकल धिम्या मार्गावरून चालतील. कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत संबंधित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा येथे थांबा घेणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply