Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कहर, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: देशात गेल्या काही दिवसापासून हवामानात (Climate) सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. अशात राज्यात काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्याने राज्यात काही ठिकाणी थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली होती. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस राज्यामध्ये थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान अंदाजानुसार, आज (4 फेब्रुवारी) उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. त्याचबरोबर तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या वातारणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | एअर इंडिया ट्रान्सपोर्टमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | किमान तापमानात घट! मराठवाडा आणि विदर्भात वाढला गारठा
- Nilesh Rane | “बदनामीचा दावा करायला मार्केटमध्ये काहीतरी इज्जत असावी लागते”;
- Nana Patole | “अजितदादांचं ‘ते’ वक्तव्य ‘TRP’साठी”; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
- BJP | “एक नवा मित्र आमच्यासोबत जोडला जाईल”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
Comments are closed.