Rain Alert | राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पाऊस, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात (Weather) सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद या ठिकाणी विजांच्या कडकडांसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

उत्तर भारतामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढलं आहे. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा या भागांमध्ये गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली रब्बी पिकं धोक्यात सापडली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे. आधीच थंडीच्या लाटेमुळे आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला नुकसानाचा सामना करावा लागला होता. तर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह मुंबईतील काही भागांमध्ये किमान तापनात घट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या