Rain Update | राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये आज गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता (Rain Update) वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे. शेतीतील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain Update) हजेरी लावली आहे. नाशिक, बुलढाणा, पालघर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, आंबा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
पुण्यात पावसाची शक्यता (Chance of rain in Pune)
पुण्यामध्ये होळीची धूम सुरू असताना अचानक वादळीवाऱ्यासह पावसाने (Rain Update) हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पेटवलेल्या होळीला झाकण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पुण्यामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणेकरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | इलेक्ट्रॉनिकल्स टेक्नॉलॉजी मटेरियल्स सेंटरमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Milk and Coffee | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दूध आणि कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ संस्थेत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Skin Irritation | त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय
- Weather Update | राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Comments are closed.