Rain Update | येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वीच राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Chance of rain over Konkan, Madhya Maharashtra and Marathwada

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह पाऊस पडण्याची (Rain Update) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, बीड, परभणी, सोलापूर, बुलढाणा, जालना, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची (Rain Update) शक्यता आहे.

दरम्यान, केरळमध्ये यंदा 4 जून रोजी मान्सूनचे आगमन आणि अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. 8 ते 10 जून दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्यालगतच्या भागातील स्थिती बिघडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Rain Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OWxY8L