InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

येत्या 72 तासात महाराष्ट्रात पाऊस: हवामान खात्याचा अंदाज

- Advertisement -

वेबटीम / मुंबई: 

- Advertisement -

गेल्या दहा दिवसांपासूनच पावसाने दडी मारली आहे. 1 जुलै ते 11 जुलैदरम्यान पाऊसच न झाल्याने राज्यातल्या 12 जिह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 13 जिह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

राज्यात मान्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवसा लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती प्रतिकूल ठरणार आहे. मान्सूच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये 35 टक्के आणि ऑगस्टमध्ये 35 टक्कश पाऊस पडतो. मात्र, गेल्या आठवडय़ात पावसाने मारलेल्या दडीने जुलैमधला टक्का कमालीचा घसरला आहे. मात्र आताच्या हवामान विभागाच्या अंदाजाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.