InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

उत्तर भारत, ईशान्य भारतात पावसाचे थैमान

उत्तर भारत तसेच ईशान्य भारतात पावसाचे थैमान घातले आहे. उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे वाहतुक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे आसाममध्येही तब्बल २१ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला असून आठ लाख लोक प्रभावित झाले आहेत.

मुसळधार पावसाने बिहारमध्‍ये पूरस्‍थिती निर्माण झाली आहे. आसामधील ८ लाख १० हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. यामध्‍ये ६ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत. बिहारच्‍या उत्तर भागातील स्‍थिती गंभीर आहे. या भागातील कोसी आणि गंडक नदीने धोक्‍याची पातळी उलटली आहे. १० जिल्‍ह्यात पूर परिस्‍थिती आहे. यामध्‍ये १६ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि त्‍यामुळे झालेल्‍या भूस्‍खलनात ४३ लोकांचा मृत्‍यू तर २४ जण बेपत्‍ता व २० लोक जखमी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply