नागपूरसह विदर्भात पुन्हा बरसला परतीचा पाऊस

हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही ठिकाणी पावसाचीु शक्यता वर्तवली होती. त्यानुसार विदर्भातील नागपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात बुधवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ येथे कालपासून ढगाळ वातावरण होते.

‘महाअधिवेशनातून नव्या स्वरुपातील राज ठाकरे दिसणार’

या बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम होत आहे . शिवाय नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने पावसाचा अंदाज अधिकच गडद केला होता. सकाळी ८ च्या सुमारास किरकोळ ते मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

Loading...

नागपुरातही गडगडाटासह पाऊस कोसळत होता. या पावसामुळे तापमान अधिकच घसरले असून, थंडीत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारपर्यंत शहरात जोरदार वारे सुटल्याने जनजीवनही विस्कळित झाले आहे. पावसाने कापूस, तूर, चणा, सोयाबीन व धान या पिकांचे अतोनात नुकसान होते आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.