राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी क्राईम ब्रांचला दिली होती ‘इतक्या’ लाखांची लाच?

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राचा पर्दाफाश झाला आहे. अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड केल्याप्रकरणी अटक झाली आहे. मात्र अशातच या प्रतकरणाबाबतीत मोठी माहिती समजली आहे.

राज कुंद्रानं अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला 25 लाख रुपयांची लाच दिली असल्याचा दावा या प्रकरणातील आरोपीने केला आहे. त्यासोबतच या प्रकरणात अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूरसुद्धा आरोपी आहे. त्याने ईमेलच्या मदतीने मार्च महिन्यात एसीबीला याबाबतची तक्रार केली होती.

त्यानंतर एप्रिल महिन्यात एसीबीनं ही तक्रार मुंबई पोलीस कमिश्नरच्या ऑफिसमध्ये पाठवली होती. दरम्यान शहरातील पोलीस अधिकारी यावर काहीच भाष्य करायला तयार नाहीत. बुधवारी क्राइम ब्रांन्चनं राज कुंद्राच्या अंधेरीतील ऑफिसमध्येही छापा टाकला होता.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा