राज कुंद्राची अटक बेकायदेशीर?; न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र राजची अटक बेकायदेशिर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, राज कुंद्राची पोलिस कोठडी आज संपणार असून गुन्हे शाखेकडुन त्याच्या कोठडीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. तसेच गुन्हे शाखेने कोणतीही नोटीस न देता अटक केल्याने ही अटक बेकायदेशिर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

राज कुंद्रा व रेयान यांनी करण्यात आलेल्या अटकेपुर्वी 41-A ही नोटीस द्यायला हवी होती. परंतु, पोलिसांकडुन ही नोटीस न देता अटक करण्यात आल्याने ही अटक कायदेशिर नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच या याचिकेवर सुनावणी होणार असून यावर न्यायालय नेमका काय निर्णय देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा