राज कुंद्राचा जामीन अर्ज दंडाधिकार्‍यांनी फेटाळला

मुंबई : पोर्नग्राफी प्रकरणात राज कुंद्राला कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्याचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला आहे. मंगळवारीच राज कुंद्राची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती ती झाली असून त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी जामीन अर्ज फेटाळला आहे.

राज कुंद्राच्या वकिलांनी जेव्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला तेव्हाच मुंबई पोलिसांनी त्याला जामीन मिळू नये म्हणून अर्ज दाखल केला. राज कुंद्राला जामीन मिळू नये असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं, तसंच राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आक्षेपही घेतला. आज आता कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दंडाधिकार्‍यांपुढे कुंद्राच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी प्रामुख्याने पुढील मुद्दे मांडले: या प्रकरणात आरोपपत्र याआधीच दाखल झाले आहे व इतर आरोपी जामिनावर आहेत.

नोंदविलेल्या गुन्ह्यांपैकी फक्त दोन अजामीनपात्र आहे. त्यांच्यासाठी होऊ शकणारी शिक्षा जन्मठेप नाही. कुंद्राची मुंबईत घट्ट पाळेमुळे आहेत, त्यामुळे तो फरार होण्याची शक्यता नाही. त्याने साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप नाही. मुळात अटक करून तपास करण्याची गरजच नव्हती. पोलिसांनी समन्स पाठवून बोलावले असते तरी तो चाब-जबाब नोंदविण्यासाठी स्वत:हून गेला असता. पण तसे समन्स पोलिसांनी पाठवलेच नाही.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा