Raj Thackeray | अजित पवार हे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाही; काका बाजूला तर काय होईल?- राज ठाकरे
Raj Thackeray | मुंबई: ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) करणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये कलाकारांसह अनेक राजकीय नेते दिसणार आहेत. या शोचे काही प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहे. राज ठाकरे यांच्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरेंनी अजित पवारांवर घणाघात केल्याचं दिसून आलं आहे.
Raj Thackeray criticizes Ajit Pawar
झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) अजित पवारांवर जोरदार टीका करताना दिसले आहे. “अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही. बारामतीमधील काकांनी हात बाजूला केला, तर अजित पवारांचं काय होईल?”, असा खोचक टोला राज ठाकरे अजित पवारांना लगावला आहे.
या प्रोमोमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) अजित पवारांची मिमिक्री करताना देखील दिसले आहे. अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरे “ए गप रे… असं मी म्हणणार होतो,” असं उत्तर देतात.
https://www.instagram.com/reel/CsidLcMtWdW/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ शोचा हा नवा प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 4 जून पासून दर रविवारी रात्री 9 वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- WhatsApp | आता तुम्ही व्हाट्सअपवर पाठवलेले चुकीचे मेसेज एडिट करू शकतात, जाणून घ्या सविस्तर
- Mumbai Police | मुंबईत लवकरच बॉम्बस्फोट होणार; मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकीचा मेसेज
- Sharad Pawar | “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत…”; PM पदाबाबत शरद पवारांचा मोठं वक्तव्य
- Sharad Pawar | “ED चा गैरवापर…”; शरद पवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
- Weather Update | राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार, तर ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43pkfLP
Comments are closed.