Raj Thackeray | “अलीबाबा आणि त्यांचे चाळीसजण सुरतला गेले”; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ओढले ताशेरे
Raj Thackeray | मुंबई : एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड करून सुरतला धाव घेतली. हे सुरतला गेलेले अली बाबा आणि चाळीस जण, त्यांना चोर म्हणता येणार नाही. कारण त्यांनी उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली.” असे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.
कोव्हिडच्या काळातील तो किस्सा सांगत राज ठाकरे म्हणाले…
कोरोना काळातील उद्धव ठाकरेंचा एक किस्सा राज ठाकरेंनी भर सभेत सांगितला. “कोव्हिडच्या काळात उद्धव ठाकरे कुणालाच भेटत नव्हते. एक आमदार आपल्या मुलाला घेऊन उद्धव ठाकरेंना कोरोना काळात भेटायला गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्या मुलाला बाहेर ठेवलं आमदाराला प्रवेश दिला.
“एकनाथ शिंदे महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेले”
“शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले. पण महाराष्ट्रातून लूट करून एकनाथ शिंदे सुरतला गेले . मग गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. पण मला एकनाथ शिंदेंना सांगायचं आहे की, रखडलेल्या पेन्शनचे काम करा. जिथे सभा घेतात तिथं उत्तर द्यायला सभा घेऊ नका. शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना भेटा…सभा घेत फिरू नका”, असे राज ठाकरे सभेत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे
- Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
- Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Comments are closed.