Raj Thackeray – कसबा- चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करा; “भाजपने दाखवला तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा” – राज ठाकरे

Raj Thackeray : आमदार मुक्ता टिळक ( Kasba Bypoll Election ) आणि आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad Bypoll Election) यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कसबा मतदार संघात हेमंत रासने आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राज ठाकरेंनी सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे.

भाजपने उमदेपणा दाखवला तोच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा

सस्नेह जय महाराष्ट्र,

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत.
मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

MNS Raj Thackeray Should Make The Election Unopposed Pune Bypoll Election

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका ( Kasba-Chinchwad by-election unopposed ) होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.

राज ठाकरे – Raj Thackeray

‘ही’ परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे-  गिरीश महाजन ( Girish Mahajan ) 

“एखादा आमदार यांचं निधन झाल्यास ती जागा त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला देण्याची प्रथा आहे. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे”, असे आवाहन करत गिरीश महाजन यांनी “चिंचवडची जागा बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. काही ठिकाणी उमेदवार वेळेवर ठरलेत. आम्ही विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कमी पडलो. पण, पुढं येणाऱ्या निवडणुकीत आम्ही नक्की विजय मिळवू”, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-