Raj Thackeray | गणेश उत्सावानंतर राज ठाकरेंची जबरदस्त पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोणताही सण साजरा झाला नाही. कोरोनाच्या हाहाकारामुळे सर्व गणेश भक्तांना मागील दोन वर्ष त्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगणन तसेच निरोप घेताना जल्लोष साजरा करता आला नाही. मात्र यंदाच्या वर्षात मोठ्या थाटा-माटात गणेश उत्सव पार पडला. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

राज ठाकरे यांचं ट्विटः

राज ठाकरे यांनी केलेल्या ट्वटमध्ये राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. कोरोनानंतरचा हा पहिला मोठा सण. हा सण अतिशय उत्सहात पार पडला, आणि तो देखील कोणतंही गालबोट न लागता. ह्याला महाराष्ट्र पोलीस, विविध महापालिका, आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन दलाचे मनापासून आभार, असं त्यांनी लिहलं आहे.

पाहा ट्विटः

यादरम्यान, उत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील अगदी कॉन्स्टेबल ते राज्याच्या पोलीस महासंचालकांपर्यंत आणि महापालिका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सफाई कर्मचारी ते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाप्रती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय कृतज्ञ आहे, असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.