Raj Thackeray | “जा लढ, मी आहे…”; बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट!

Raj Thackeray | मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. मनसेने देखील आपल्या ट्विटर हँडलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असं मनसेने ट्वीट केलं आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील हा व्हिडिओ मनसेने ट्विट केला आहे.

राज ठाकरे म्हणताना दिसतात की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”

पुढे ते म्हणतात, “मुलाखतकाराने मला विचारलं भुजबळांचे बंड, नारायण राणेंचे बंड, शिंदेंचे बंड आणि माझे बंड. मी म्हटले, माझे बंड लावू नका त्यात. हे सगळे जण गेले ते एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. हा तुमचा राज ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटून, त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खूपसून असा नाही बाहेर पडलो. बाहेर पडून दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.