Raj Thackeray | भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे न पटणार आहे; मनसे नेत्याची संतप्त प्रतिक्रिया
Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चं (ODI World Cup Tournament 2023) वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावरून मनसे नेत्यांनं संताप व्यक्त केला आहे.
Uddhav Thackeray group has left Hindutva – Sandeep Deshpande
मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत ट्विट केलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्थानात व्हावा हे न पटण्यासारखं आहे, असं संदीप देशपांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरे गटानं हिंदुत्व सोडलं असल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये (Raj Thackeray) नमूद केलं आहे.
ट्विट (Raj Thackeray) करत संदीप देशपांडे म्हणाले, “भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे.”
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2023
दरम्यान, 5 ऑक्टोबर 2023 पासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान हा सामना 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस कदाचित झोपेत बडबडत असतील; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- Sanjay Raut | केंद्र सरकारनं पाकिस्तानला दम देण्यापेक्षा चीनला दम घ्यावा – संजय राऊत
- Uddhav Thackeray | अध्यक्ष महोदय…हम करे सो ‘समान’ कायदा; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Jitendra Awhad | “शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी…”; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- Aditya Thackeray | मोठी बातमी! मुंबईत आदित्य ठाकरेंच्या गाडीचा झाला अपघात
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3r5gZY7
Comments are closed.