Raj Thackeray | मराठी उमेदवारांनाच निवडून आणा ; राज ठाकरेंची कर्नाटकच्या मराठी भाषिकांना साद
Raj Thackeray | मुंबई : सध्या कर्नाटक निवडणूकीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलं आहे. तरब प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या काही तासांवर मतदान करण्याचा अवधी राहिला आहे. तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचा वाद अजूनही चालूच आहे. राजकीय नेते या विषयावर बोट ठेवून प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. तर आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन केलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ( What Raj Thackeray Said )
राज ठाकरे यांनी तेथील मराठी भाषिकांना साद घातलं आवाहन केलं आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही बघितलं असेल की, कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरीही तो मराठी भाषिकांचे प्रश्न विधानभवनात मांडत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी सीमावादावर कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकोपा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. म्हणजे दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. परंतु तस खी झालं नाही. यामुळे मी तुम्हाला सांगतो की, येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा . असं आवाहन राज ठारेंनी केलं आहे.
दरम्यान, वर्षानुवर्ष सुरू असणारी इथल्या मराठी भाषेची गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडली जात नाही. जर इथलं सरकार अशा पद्धतीने मराठी भाषिकांना त्रास देणार असेल तर हीच वेळ आहे त्यांना त्यांची जागा दाखवा. तुमचं सर्वांचं हित हे मराठी आमदाराला निवडून देण्यात आहे. यामुळे तुम्ही ठरवा ही संधी घालवायची की सत्कारणी लावायची.
आपला
राज ठाकरे
अशा शब्दांत राज ठाकरे यांनी कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी भाषिकांना आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी मराठी अस्त्र बाहेर काढल्याचं बोललं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Chagan Bhujbal | राष्ट्रवादीने मविआमधून बाहेर पडावं अशी राऊतांची इच्छा? छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
- The Kerala Story | ‘द केरळ स्टोरीला’ विरोधकांकडून प्रचंड विरोध; तरीसुद्धा 3 दिवसांत जबरदस्त कमाई
- Rupali Chakankar | महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 5 हजाराहून अधिक मुली गायब, रूपाली चाकणकरांनी दिली माहिती
- Sharad Pawar | शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी; सामना अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र
- Narendra Modi | “जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नाही” : नरेंद्र मोदी
Comments are closed.