Raj Thackeray | “महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले…”; राज ठाकरेंचा पुढचा मुद्दा
Raj Thackeray | नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे, असा मुद्दा राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवरती जे दर्गे उभारले आहे ते हटवलेच पाहिजे. महाराजांच्या गड-किल्ल्यांवर दर्ग्यांचा काही संबंध नाही. ज्या गोष्टी योग्य आहे, त्या झाल्याच पाहिजे.”
यावेळी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नोटबंदीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, “हा शासनाचा धरसोडपणा आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती. कधीही आणायचं आणि कधीही बंद करायचं. जेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएम मशीनमध्ये जात नव्हत्या. म्हणजे त्या नोटा एटीएममध्ये जातात की नाही हे देखील तपासलं गेलं नव्हतं. हे असे निर्णय देशाला परवडणारे नसतात.”
“महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम राहतात. मात्र, तिथे कधीच दंगली होत नाही. कारण ते पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहतात आणि मराठी बोलतात. या ठिकाणी जे सामंजस्य आहे, ते विनाकारण बिघडवू नका. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशांमध्ये जर ‘हिंदू खतरे मे हैं’ असं म्हटलं जात असेल, तर कसं होईल? निवडणुका जवळ आल्यावर हा धार्मिक वाद वाढत जाणार आहे”, असंही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | “मग मी काय मंडप…”; मविआच्या रद्द झालेल्या सभावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | गद्दार आणि 50 खोके शब्द जनतेला पटलेला; अजित पवारांनी घेतला शिंदे गटाचा समाचार
- Vajramuth Sabha | मविआमध्ये वज्रमुठ सभांसाठी पुन्हा हालचाली सुरू, पुण्यात कधी होणार सभा?
- Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान
- Sanjay Raut | “मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा…”; नोटबंदी प्रकरणावरून संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्त्र
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43eGVyg
Comments are closed.