Raj Thackeray | “मी उद्धव ठाकरेंसोबत युती करणार…”; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Raj Thackeray | दापोली: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या दोन्ही घटनांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी कोणासोबतच युती करणार नसल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

I will not make an alliance with anyone – Raj Thackeray

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या चर्चांना राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, “मी कुणासोबतच युती करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते पाहता मी कुणाशीही युती करेल, असं वाटत नाही.”

पुढे बोलताना ते (Raj Thackeray) म्हणाले, “निवडणुकांपूर्वी युती होते आणि निकाल लागल्यानंतर सत्ता वेगळीच लोकं स्थापन करतात. मतदारांच्या भावनांशी खेळण्याचा हा खेळ मला खेळता येणार नाही. हे मला अजिबात जमत नाही. याला जर राजकारण म्हणत असतील तर मी त्या राजकारणासाठी नालायक आहे.”

“दोन-तीन वर्ष निवडणुका प्रलंबित राहतात. या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही. सध्या राजकारणामध्ये नुसती चालढकल सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार जाहीर करणार आहे.

या निवडणुकीमध्ये मी एकटा लढणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयारी देखील सुरू केली आहे”, असही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44pFgXA