Raj Thackeray | रत्नागिरीमधील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ; म्हणाले …

Raj Thackeray | रत्नागिरी : आज (6 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण दौऱ्यावर आहेत. त्यानी रत्नागिरी येथे सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून जोरदार हल्लाबोल केला. तसचं कोकणातील स्थानिकांना विनंती करत आव्हान केलं. तर भाषणातून त्यांनी मुंबईच्या महापौर बंगल्याबाबत उद्धव ठाकरेंना थेट सवाल देखील केला आहे.

मुंबईचा महापौर बंगला हा काय लोकांना विचारुन ढापलात का?

राज ठाकरे यांनी सभेच्या भाषणातून उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत म्हटलं की, पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष बारसूला येऊन गेले. इकडे येऊन काय म्हणाले? जी लोकांची भावना आहे ती आमची भावना आहे. मग मुंबईचा महापौर बंगला हा काय लोकांना विचारुन ढापलात का? असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला आहे. याचप्रमाणे त्यांनी कोकणातील बांधवांना सावध रहा ही विनंती देखील केली आहे. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, ही तुमच्या हक्काची जमीन आहे. कोणाला देऊ नका कारण ही जमीन तुम्हाला अधिक उत्पादन देईल पैसे देईल. जरी कोणी तुमच्याकडे जमीन मागायला आलं तर त्याला त्याची जागा दाखवा. अशा शब्दांत स्थानिकांना आव्हान केलं.

(Raj Thackeray Commented On Uddhav Thackeray )

दरम्यान, आतापर्यंत जो कोणी तुमच्याकडे आला त्याचा प्रत्येकाचा काहीतरी हेतू होता. तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देता. परंतु त्याने आतापर्यंत तुमच्याकडे बघितलं तरी का ? याचा विचार करा. ज्याला जनतेचा हित कळत नाही. ते तुम्हाला कसले मदतीचा हात देणार. हे सगळे फक्त फसवत आहेत. तुम्हाला मूर्ख बनवत आले आहेत आजपर्यंत. थोडा विचार करा या सगळ्या गोष्टींचा. तसचं प्रत्येकाचा व्यापारविषयक हेतू आहेच. या सगळ्या गोष्टींमधून आपलं कोकण वाचवा, कोकण वाचलं पाहिजे यासाठी प्रयत्न करूया. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-