Raj Thackeray | “राजकारणात मी अपघाताने आलो…” ; राज ठाकरे यांची मोठी प्रतिक्रीया

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच घोषणा केली की ते छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या इतिहासावर आधारित सर्वात मोठा चित्रपट बनवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासावर अनेक मराठी हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असतात. अशात लवकरच महेश मांजरेकर यांचा देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरून सध्या बराच वाद निर्माण झालेला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये मोठं विधान केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहे की,”राजकारणात जरी मी अपघाताने आलो असेल तरी चित्रपट निर्मिती ही माझी पहिली पसंती आहे. त्यामुळे कोणताही चित्रपट बघत असताना मी त्याच दृष्टीने तो चित्रपट बघतो. यामध्ये हे चित्रपट बघत असताना अनेक चित्रपट खूप घाईगडबडीने बनवले जात असल्याचं जाणवत आहे.” अशी भावना राज ठाकरे यांनी या मुलाखतीदरम्यान व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर राज ठाकरे म्हणाले आहे की, ” निवडणुका आपल्या देशात एक धंदा झाला आहे, त्यामुळे त्यातून चित्रपटाच्या निर्मितीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. कॉलेजमध्ये असताना मी गांधी हा चित्रपट पाहिला होता. गांधी पाहिल्यानंतर असं वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील असा चित्रपट तयार व्हायला हवा. त्या चित्रपटावर माझे काम सुरू आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होईल.”

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की,”मराठी चित्रपट फार घाई गडबडीने तयार केले जातात असे माझ्या लक्षात आले आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांमधील स्क्रीन प्ले नावाची गोष्ट नसते आणि बऱ्याच त्रुटी देखील असतात.” पुढे ते म्हणाले,”पण काही मराठी चित्रपट खरोखरच चांगले असतात आणि त्या चित्रपटांमध्ये कास्टिंग आणि बांधणी देखील उत्तम असते. चित्रपट सृष्टीमध्ये नवीनवीन गोष्टी बघायला मिळत आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला परत सुवर्णकाळ मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो.”

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.