Raj Thackeray | राज ठाकरेंचा दिलदारपणा; वांजळेंच्या निधनानंतर हक्काची जागा सोडली होती राष्ट्रवादीला

Raj Thackeray | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने आपले उमेदवार निश्चित करत अर्ज देखील भरले आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असं अवाहन देखील केलं आहे. राज ठाकरेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे अवाहन केले आहे.

महाराष्ट्राचा आजपर्यतचा इतिहास पहिला तर लक्षात येत कि, एखाद्या आमदार किंवा खासदाराचे निधन झालं कि पोटनिवडणुकीणूत त्यांच्या घरातील सदस्य निवडणुकीला उभा असेल तर विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा नाही. ती जागा बिनविरोध द्यायची. पण सध्याचं राज्यातील राजकारण पाहता शिवसेना आणि भाजप मागे हटायला तयार नाहीत. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गट, भाजप आणि शिंदे गट या तिघांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. तसेच आगामी हि निवडणूक आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाची मनाली जातेय.

आता बहुतांश लोकांना हा प्रश्न पडला असेल कि, उद्धव ठाकरे गट आणि भाजपच्या लढाईत राज ठाकरेंनी सहभाग का घेतला असेल. याआधी असाच एक किस्सा घडला होता. मनसेचा इतिहास पहिला तर दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचं नाव लगेच समोर येत. राज ठाकरेंचा अत्यंत जवळचा आमदार. २००९ ला ते निवडून विधानसभेत गेले. पण पुढे लगेच वांजळे यांचा २०११ला हृदयविकारानं मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लगेच पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र यावेळी पोटनिवडणुकीत मतदार संघात पक्षाची ताकद असताना सुद्धा राज ठाकरे यांनी फक्त रमेश वांजळे यांच्या पत्नी आमदार हर्षदा वांजळे या स्वतःच्या पक्षातून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुकीला उभ्या राहिल्या तरी ती जागा सोडली होती. यामधून राज ठाकरे यांचा दिलदारपणा दिसून येतो.

राज ठाकरे यांचं फडणवीसांना पत्रातून अवाहन

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून ( Andheri East Election ) आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे, असंही या पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.