Raj Thackeray | राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड मान्य आहे का?
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) अख्या राज्याचेच नव्हे तर जगाचे प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच सिनेमॅटिक लिबर्टी (Cinema Liberty) च्या नावाखाली इतिहास (History) ची मोडतोड केलेली चालणार नाही. मराठी चित्रपटसृष्टी सह बॉलीवूडमध्ये देखील अनेक ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासासोबत कोणताही छळ केलेला चालणार नाही असं वक्तव्य छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपट आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये लाँच झालेला वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हर हर महादेव या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेला आहे. तर वेडात मराठे वीर दौडले या चित्रपटाला सुद्धा त्यांचा पूर्ण पाठिंबा असून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी राज ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी राज ठाकरे यांच्या या वागणुकीवर सवाल उठवला आहे. राज ठाकरे यांना इतिहासाची झालेली मोडतोड चालणार आहे का? असा प्रश्न देखील तमाम शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, हर हर महादेव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाच्या सगळ्या प्रोड्युसरवर कायदेशीर कारवाई करा, असे देखील छत्रपती संभाजी राजे म्हटले आहे. कारण चित्रपटांमध्ये एकही मावळ्याच्या डोक्यावर पगडी नाही आणि हा त्यांचा मोठा अभिमान आहे. म्हणून छत्रपती संभाजीराजे आणि तमाम शिवप्रेमी संतप्त झाले आहे. खरा इतिहास वाचून समजून घेऊन मगच त्यावर चित्रपट निर्मिती करायला पाहिजे, असे देखील ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…
- Arjun Kapoor | अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर
- Poonam Mahajan | “माझ्या बापाला कोणी मारलं मला माहीत आहे, मात्र मास्टरमाइंड…”, पूनम महाजनांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Eknath Shinde । “आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी…”; उद्धव ठाकरेंच्या मध्यावधी निवडणुकांच्या भाकितावर एकनाथ शिदेंची प्रतिक्रिया
- Thackeray vs Shinde | राजकीय वातावरण तापणार! ; ठाकरे-शिंदे यांच्या आज जाहीर सभा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.