Raj Thackeray | राष्ट्रवादी काँग्रेसने जातीय राजकारण सुरू केले ; राज ठाकरेंचा आरोप

Raj thackeray | सिंधुदुर्ग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधतील. आज राज ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात केला. शिवाजी महाराजांवर वारंवार वक्तव्य केले जातात, यावर राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावरून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीय राजकारण करण्याचा आरोप केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, “कोणीतरी काहीतरी बोलतो, त्यानंतर वाद होतात. ह्या सर्व जातीच्या राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या अगोदर जी मानसे जन्माला आली त्यांना काय इतिहास कळत नव्हता का, त्यांनी काय वाचल नव्हत का?. की यांनाच इतिहास कळायला लागला, यांचाच अभिमान जागृत झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पासून जातीचे राजकारण सुरु झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात ह्या गोष्टी सुरु झाल्या.”

राज ठाकरे यांनी शरद पवारांवर देखील घणाघात केला. “जे शरद पवार साहेब स्वत:हून कधीही शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत. त्यांची भाषणे काढून बघा, व्यावपिठावर फक्त शाहू, फुले, आंबेडकर. मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हापण विचारले होते. त्यात ते म्हणाले होते शाहू, फुले, आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराज काय विचार नव्हता का? त्या विचारावर आधारित पुढचे विचार आहेत. मुळ विचार शिवरायांचा आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.

“शिवरायांचे नाव घेतले की मुस्लिम मते जातात. मग कुठल्यातरी टोळ्या फंडींग द्यायला उभ्या करायच्या. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचे राजकारण करुन घ्यायचे. इतर समाज आणि मराठा समाज यात जशी-जशी फूट पाडता येईल, तसा प्रयत्न करायचा. राष्ट्रवादीच्या जन्मापासून हे सुरु झालं. महाराष्ट्रात १९९९ पासून हे विष कालवल्या गेलं,” असा आरोप राज ठाकरेंनी केला आगे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.