Raj Thackeray | राहुल गांधींचे सावरकरांबाबत वक्तव्य, मनसे आक्रमक! काळे झेंडे दाखवण्याचे राज ठाकरेंचे आदेश

Raj Thackeray | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. भाजप-शिंदे सरकार (BJP-Shinde government), तसेच राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे आक्रमक झाली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी वीर सावरकरांवर विवादास्पद वक्तव्य केले. वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून त्यांची मदत केल्याचे म्हटले आहे. दरम्यान राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे. भारत जोडो यात्रा आज अकोला जिल्ह्यात असून ही यात्रा उद्या बुलढाणा जिल्ह्यात येणार आहे. शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा होणार आहे.

दरम्यान, राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना शेगाव येथे जमा होण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे. शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा, असे राज ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी-

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, वीर सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिले की, “मै आपका नौकर रहना चाहता हु” आणि त्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांना घाबरून पत्रावर सही करून विश्वासघात केला.

राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेले वक्तव्य. याविरोधात सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.

राहुल गांधी त्यांच्या विधानावर ठाम-

दरम्यान आज अकोल्यात बोलताना राहुल गांधी त्यांच्या विधानावर ठाम आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले. राहुल म्हणाले की, सावरकरांनी घाबरून इंग्रजांची माफी मागितली, पण गांधीजी, नेहरू आणि पटेल यांनी तसे केले नाही. सावरकरांचे पत्र दाखवत राहुल गांधींनी शेवटची ओळही वाचून दाखवली. ‘मै आपका नौकर रहना चाहता हु’, असे सावरकरांनी लिहिले होते, असे राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावरकरांचे पत्र बघायचे असेल तर त्यांनीही बघावे, असे राहुल गांधी म्हणाले. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. मी यावर अगदी स्पष्ट आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करावा.

उद्धव ठाकरे यांची भुमिका – 

सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. मात्र ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारावा हे दुर्देव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा. आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढयात भाग नव्हता. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.