Raj Thackeray | “विक्रम गोखले यांची तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच…” ; राज ठाकरे यांची फेसबूक पोस्ट
Raj Thackeray | मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले (Vikram Gokhale passed away). त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते वयोमानानुसार अनेक आजारांनी त्रस्त होते. गेल्या 20 दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान 77 वर्षीय विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी आज 26 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. मराठी ते हिंदी जगतात त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहीली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट-
मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात अनेकदा असं जाणवतं आलंय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे ह्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेकी उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमला होती.
तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं.
मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही.
भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.
महत्वाच्या बातम्या :
- Neelam Gorhe | “रामदेव बाबांचं वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारं”; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला संताप
- Jitendra Awhad | “ज्या माणसाने दारू पिऊन…”; जितेंद्र आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल
- Vikram Gokhale | ‘या’ चित्रपटातून विक्रम गोखले यांनी केला होता फिल्मी दुनियेत प्रवेश
- Amol Kolhe | “भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात…” ; अमोल कोल्हेंची विक्रम गोखलेंसाठी भावूक पोस्ट
- Eknath Shinde | विक्रम गोखलेंच्या जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे नुकसान – एकनाथ शिंदे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.