Raj Thackeray | शिवतीर्थवर खलबतं! राज ठाकरे अन् आशिष शेलारांची भेट, राजकीय चर्चांणा उधाण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांची ही भेट अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचं सांगितलं जातं आहे. अशातच आता राज ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची देखील भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी आशिष शेलार पोहचले असता त्यांच्यात चर्चा झाली.

राज ठाकरे अन् आशिष शेलार यांची भेट –

निवडणुकीत मुरजी पटेल ३० हजार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आशिष शेलारांनी व्यक्त केला होता. अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचेही मतदार आहेत. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राज ठाकरे- आशिष शेलार भेट महत्वाची मानली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये बंद दारा आड तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीवर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील इतर प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, या भेटीतील चर्चेचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे अंधेरीत प्रचाराला जाणार का? मनसे उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.