Raj Thackeray | “शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण बाळासाहेबांना पेलेलं”; एकाला झेपला नाही, आता दुसऱ्याला तरी झेपेल का?

 Raj Thackeray | मुंबई :  सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केले आणि शिवसेनेचे दोन गट पडले. यावरून राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेना फुटली तेव्हा खूप त्रास झाला, जो पक्ष लहानपणापासून पाहत आलोय. पाहतच नाही तर पक्ष अनुभवत आलोय. त्या पक्षाचं धनुष्यबाण आणि शिवसेना नाव यावरून वाद सुरू होता. एकाला शिवसेना सांभाळता नाही आली. पण आता दुसऱ्याला तरी सांभाळता येईल का?” असा सवाल त्यांनी भाषणातून केला.

“धनुष्यबाण कोणालाही सांभाळता येणार नाही”

शिवसेना पक्ष हा लहानपणापासूनच बघत आलोय. मी माझ्या छातीवर वाघ घेऊन जगलोय. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष आता एकाला झेपला नाही. आता दुसऱ्याला तरी झेपेल का? “धनुष्यबाण हे फक्त बाळासाहेबांना पेललं आहे, इतर दुसऱ्या कोणालाही पेललं नाही”, असे राज ठाकरे सभेत सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल बोलले.

महत्वाच्या बातम्या