Raj Thackeray | सगळे शेफारले, तर आधी राजीनामा द्या ; राज ठाकरेंचा मनसैनिकांना इशारा!

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे. संबंधित नेत्यांच्या परवानगी शिवाय माध्यमांसमोर बोलण्याची कार्यकर्त्यांना बंदी केली आहे. असे झाले तर पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या, असे देखील राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. यावेळी इतर पक्षांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे-

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,

सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.

माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या!

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.