Raj Thackeray | “हे निर्णय देशाला…”; नोटबंदीवर राज ठाकरेंची सडकून टीका

Raj Thackeray | नाशिक: भारतीय रिझर्व बँक (RBI) ने दोन हजार रुपयांच्या नोटवरबंदी घातली आहे. ही बंदी घालताना नोटा बदलण्यासाठी सरकारकडून सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नोटबंदी प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारचे हे निर्णय देशाला परवडणारे नसतात, अशा खोचक शब्दात राज ठाकरे यांनी टीकास्त्र चालवलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, “हा शासनाचा धरसोडपणा आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती. कधीही आणायचं आणि कधीही बंद करायचं. जेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या तेव्हा ते एटीएम मशीनमध्ये जात नव्हत्या. म्हणजे त्या नोटा एटीएममध्ये जातात की नाही हे देखील तपासलं गेलं नव्हतं. हे असे निर्णय देशाला परवडणारे नसतात.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आता पुन्हा एकदा लोकांना दोन हजाराच्या नोटा बँकेमध्ये जमा कराव्या लागणार आहे. त्यानंतर तुम्ही परत नवीन नोटा बाजारात आणणार. असं काय सरकार चालतं का? असे थोडी ना प्रयोग होतात. नोटबंदी या विषयावर मी पूर्वी देखील बोललो होतो.”

यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “वर्षानुवर्ष तिथे जर ही परंपरा चालत असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक मशिदी आणि मंदिर आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45aapPo

You might also like

Comments are closed.