Raj Thackeray । पाकिस्तानविरुद्ध भारताने विजय मिळवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “तोड नाही…”

Raj Thackeray । मुंबई : टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने धाव घेत भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य दिले होते, विराट कोहलीच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. संपूर्ण जगात भारतीय संघाचे कौतुक होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया –

“पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे ! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा,” असे राज ठाकरे म्हणाले. तसेच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सुरु होता. अखेरच्या षटकात सामन्यात अनेक ट्विस्ट देखील पहायला मिळाल्या.

शेवटच्या षटकातील थरार-

भारताला 6 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. हे षटक डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने टाकले. पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार मारले. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने धाव घेतली. कोहलीने तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर षटकार मारला. तोही नोबॉल होता. आता 3 चेंडूत 6 धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर कोहली बोल्ड झाला, पण फ्री हिटमुळे तो आऊट झाला नाही. 3 धावाही मिळाल्या. आता 2 चेंडूत 2 धावा करायच्या होत्या. कार्तिक 5 व्या चेंडूवर यष्टिचित झाला. त्याने 2 चेंडूत एक धाव घेतली. आता एका चेंडूवर 2 धावा हव्या होत्या. नवाजने पुढचा चेंडू वाईड दिला. अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात पाकिस्तान संघ चांगलाच कावरा-बावरा झाला होता. नो बॉल आणि वाईड गेल्यानंतर पाकिस्तानी खेळाडून पंचांवर दबाव आणत होते. मात्र नशिबाला सुद्धा पाकिस्तान जिंकणे मान्य नव्हते. त्यामुळे शेवटल्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा विजय झाला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.