InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज ठाकरेंनी कापला ‘५१’ किलो ‘EVM’ केक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस शुक्रवारी झाला.  या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी ५१ किलो ईव्हीएमचा केक कापला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ५१ किलोचा ईव्हीएम केक आणला होता.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वत्र ईव्हिएम चर्चेत होते. सर्व स्तरातून ईव्हिएम टिका होत असताना राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. मात्र, आता वाढदिवसाच्या दिवशी ईव्हीएमचा केक कापून त्यांनीही या पद्धतीला विरोध दर्शवला आहे असेच म्हणावे लागेल.

वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला.  ईव्हीएमचा ५१ किलोंचा केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री पायल रहतोगीचा निषेध करणारा केकही यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आणला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.