शिवाजी महाराज, रामदास स्वामी… राज्यपालांना काही कळतं का?, नक्कल करत राज्यपालांवर राज ठाकरेंची टीका

मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिन पुण्यात आले होते. दरवर्षी मुंबईत होणारा वर्धापन दिन पुण्यात पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. कोरोनाच्या काळात एकही सभा झाली नव्हती त्यामुळे पहिलंच भाषण असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी टीका केली. ते परवा आमचे राज्यपाल, काही समज वगैरे काही आहे का? मी पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा बघितलं कसं आहे ते, शेकहँड केल्यावर माझा हात बघायला लागतील, असं वाटलं, आपका मंगल यहा पै है, बुध यहा पै है. तुम्हाला काही कळतं का?, असं म्हणत त्यांनी राज्यपालांची खिल्ली उडवली.

तसेच पुढे ते म्हणाले कि, शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काही माहीत आहे का? आपला काही संबंध नसताना, आपला काही अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं. छत्रपतींनी रामदास स्वामी माझे गुरू होते, असं कधीच सांगितलं नाही. रामदास स्वामींनी छत्रपती महाराज माझे शिष्य होते, असंही सांगितलेलं नाही. नुसती भांडणं लावायची, ज्यातून एकाचं शौर्य कमी करायचं, एकाची विद्वत्ता कमी करायची, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या