InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘खडकवासल्यात आलो की, माझ्या रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल पुण्यामध्ये सभा पार पडली. या सभेत देखील राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र या सभेत राज ठाकरे काही काळासाठी भावूक झालेले दिसले. खडकवासल्यात आलो की माझ्या रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आमदाराच्या आठवणीने भावूक झाले.

रमेश वाजंळे हे मनसे पहिले आमदार होते. तसेच सोन्याचे दागिने घालत असल्याने रमेश वांजळे यांची गोल्डमॅन म्हणूनही ओळखले जात असे. 2011 मध्ये रमेश वांजळे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

“खडकवासला भागातून जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी तुमच्या टाळ्यांसाठी कधीच बोललो नाही. दरवेळेला आम्ही इथून जातो येतो तेव्हा गाडीमध्ये आमची नेहमीच चर्चा होते, की माझा वाघ गेला. आज खरंतर ते असायला हवे होते,” असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.