सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरे मैदानात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मनसे पक्षाची राजकीय वाटचाल, राज्यातील शेतीचे प्रश्न आणि राजकीय परिस्थिती, केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडी यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक सत्तानाट्य घडलं. या सत्तानाट्यात आधी भाजप आणि शिवसेना हे पक्ष केंद्रस्थानी होते. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून या दोन पक्षांची युती तुटल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही स्पर्धेत आले. महिनाभर चाललेलं हे सत्तानाट्य अखेर 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संपलं. मात्र या सगळ्यात राज ठाकरे यांची मनसे कुठेच दिसली नाही.

आता मात्र राज ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या असून आगामी काळातील रणनीती ठरवण्यासाठी आज होणार मनसेची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आहे, तर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे राज ठाकरे जनतेचे प्रश्न घेऊन राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला एकाच वेळी लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.