InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मनसे महाआघाडीच्या वाटेवर, वर्धापनदिनी होणार घोषणा

गेली 13 वर्ष आघाडीपासून दूर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, महाआघाडीत दाखल होणार असल्याची घोषणा लवकरच करणार असल्याचे समजते. मनसे महाआघाडीत दाखल होण्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. येत्या 9 मार्चला मनसेचा 13 वा वर्धापन दिन असल्याने यादिवशी महाआघाडीत सहभागी होणार असल्याची घोषणा राज ठाकरे करण्याची शक्यता आहे. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळे होत, स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.

भाजपवर सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यामधून कल्याणची एक जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच कल्याणसह काँग्रेसच्या कोट्यातील आणखी एक जागा मिळवण्यासाठी बोलणी सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply