लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला

लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी आता चालू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या राजकीय भेटीने राज्यात चर्चाना उधाण आले आहे.

शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या भेटीत अनेक राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीत घेण्याच्या दृष्टीने हि भेट झाली असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता मनसेला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-शिवसेना युतीला सामोरं जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.