InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अयोध्या निकाल: आज बाळासाहेब असायला हवे होते; राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

- Advertisement -

अयोध्या मंदिरबाबत  सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत.

- Advertisement -

Loading...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं. राज ठाकरे म्हणाले, “आज अतिशय आनंद झाला. इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती ती आज संपली असं म्हणायला हरकत नाही. या संपूर्ण आंदोलनात, संघर्षात ज्या कारसेवकांनी बलिदान दिलं, ते कुठेतरी सार्थकी लागलं असं म्हणावं लागेल.

राम मंदिर लवकरात लवकर बांधावं. त्याशिवाय देशात रामराज्यही आणावं, जेणेकरुन आज ज्या देशात नोकऱ्या जातायेत, इतर काही गोष्टी घडतायत, ते संपावं. आजच्या निर्णयानंतर मला मनापासून काही वाटत असेल तर, आज बाळासाहेब असायला हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता. सर्वोच्च न्यायालयाचं मी मनापासून आभार मानेन, अभिनंदन करेन, इतका धाडसी निर्णय घेतला.” असे राज ठाकरे म्हणाले

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.