राज ठाकरेंचा शिवसेनेने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर निशाणा

रस्ते, बरोजगारी, पक्षांतर करणारे नेते, पीएमसी बँक आणि सिटी को. ऑप बँकेतील घोटाळ्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरेंची भिवंडीत प्रचारसभा पार पडली. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं नावही राज ठाकरेंनी यावेळी घेतलं.

काही विशिष्ट माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती राहणार नाही. आपण काम नाही केलं तरी लोक आपल्याला निवडून देणार, असा समज त्यांचा झाला आहे. विरोधी पक्षात असलेले नेतेच आज सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते पराभूत होणार नाहीत, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

पीएमसी आणि सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीयेत. बँका बुडत आहेत, उद्योग बुडत आहेत, तरीही नागरिक गप्प का आहेत, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ सिटी कॉऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत. मात्र सिटी बँक बुडल्यानंतर खातेदारांनी अडसूळ यांची भेट घेतली. त्यावेळी अडसूळांनी ‘मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा’, असं उत्तर खातेदारांना दिलं असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.