InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महागठबंधनमध्ये स्थान न मिळाल्याने; मनसेची खलबतं सुरु

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीशी साधलेली जवळीक फुकट गेली की काय, असा मनसेसमोर प्रश्न आहे. महागठबंधनमध्ये स्थान मिळालं नाही तर करायचं काय यावर मनसेची खलबतं सुरु आहेत.

सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत मनसे मुंबई आणि ठाण्यासह तीन जागा लढवण्याच्या तयारीत आहे. महागठबंधनमध्ये मनसेला स्थान मिळालं नाही, तरी मनसे लढवत असलेल्या तीन जागांवर आघाडीचा उमेदवार दिला जाऊ नये, असा प्रस्ताव ठेवण्याबाबत मनसेच्या गोटात चर्चा सुरु आहेत.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.