मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं राज ठाकरेंंचं आवाहन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना EDने दिलेल्या नोटीसवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. 22 तारखेला ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नका, मुंबईत येवू नका आणि सार्वजनीक मालमत्तेची नुकसान करू नका , कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तरीही शांतच राहा असं आवाहनही त्यांनी केलंय. असं आवाहन स्वत: राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यंना केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू.  माझ्यावर असलेल्या तुमच्या प्रेमाची मला जाणीव आहे, तरीही ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.