बैल कधी उभ्या उभ्या तर कधी चालता चालता मुततो तशा भूमिका मी बदलत नाही; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे वक्तव्य

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

याआधी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दल भूमिका स्पष्ट केली तरच युतीचा विचार केला जाईल, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. भूमिका स्पष्ट काय करायच्या? माझ्या भूमिका स्पष्टच आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल कधी कधी उभ्या उभ्या तर कधी कधी चालता चालता मुततो. तशी भूमिका मी बदलत नाही, असे रोखठोक विधान करून राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे पुढे म्हणाले, माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या बिलकूल स्पष्ट आहेत. त्या देशहिताच्या आहेत आणि महाराष्ट्रहिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यानी आपली भूमिका कशी निभवायला हवी, काय काय गोष्टी करायला हव्या, तुम्ही आमच्या महाराष्ट्रात आक्रमण करू नका. आम्ही तुमच्या राज्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा